एका आंबेडकराचा पवास मार्क्सवादाकडे?
खैरलांजी प्रकरणावरुन जेव्हा महाराष्ट्रभर आक्रमक आंदोलन सुरु झाले होते. त्यावेळी यामागे नक्षलवाद्यांची फूस आहे असा आरोप सरकारने केला होता. काही कार्यकर्त्याना नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप ठेवून तुरुंगातही डांबले होते. त्यावेळी आंबेडकरवादी जनता पोलिसांचा निषेध करत रस्त्यावर उतरली होती. आंबेडकरवादी आंदोलक हिंसक मार्क्सवादी असूच शकत नाही हा महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेचा ठाम विश्वास होता व अजूनही आहे. खैरलांजी आंदोलनात आंबेडकरवादी तरुणांनी दाखविलेली तडफ,धाडस आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची हिम्मत पाहून नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादी तरुणांना नक्षलवादी संघटनेत सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यातून एका स्वंतत्र संघटनेचा जन्म झाला.त्या संघटनेचं नाव आहे कबीर कला मंच... कुठे आहे? तर पुण्यात! कोणी जन्मास घातली? कम्युनिस्टानी. म्हणजेच... बाबासाहेबांच्या कट्टर विरोधकानी. हो कम्युनिस्ट हे बाबासाहेबांचे कट्टर विरोधक व शत्रू होते. कारण बाबासाहेबानी मुंबईतील गिरणी कामगारांची चळवळ कम्युनिस्टांचा हातून खेचून नेली होती. संपाच्या नावाखाली त्याकाळातीलअस्पृश्य कामगारांचे आर्थिक खच्चीकरण करून त्यांना देशोधडीला लावण्याचे ब्रह्मोकम्युनिस्टांचेकारस्थान बाबासाहेबांनी उधळून लावले होते. यामुळे त्यावेळीच्या लाल सलामवाल्यांनी बाबासाहेबांवर हल्ला करण्याचा डाव आखल्याचे उघडकीस आले होते. बाबासाहेबांच्या जीवावर उठलेल्या कम्युनिस्टचळवळीला बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये रुजविण्याचे पातक करण्यास आज त्यांच्याच वंशातीलआणि समाजातील लोक पुढे सरसावले आहेत. परवाचउत्तम खोबरागडे या माजी सनदी अधिकाऱयाने आपण कट्टर मार्क्सवादी असल्याचे वक्तव्य केल्याचेदै. जतनेचा महानायकमधून छापून आले आहे. यापूर्वी डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी मार्क्सवादहे शास्त्रशुद्ध तत्वज्ञान आहे. परंतु आंबेडकरवाद नावाचे कोणतेही तत्वज्ञान अस्तित्वातनाही असे चंदिगड येथील ब्रह्मोकम्युनिस्टांच्या परिषदेत सांगितले आहे. नक्षलवादी चळवळीचामहाराष्ट्राचा पमुख नेता असलेल्या मिलिंद तेलतुंबडेंची पत्नी व त्याचे काही नातेवाईकबाबासाहेबांच्या धम्मपिय समाजाला हिंसक गुन्हेगारी चळवळीत समाविष्ट करण्याचे पयत्नकरीत आहेत. कबीर कला मंचाच्या नावाने निळ्या पट्ट्या बांधून लाल सलाम म्हणणाऱयांनाबाबासाहेबांचे नातू ऍड. पकाश आंबेडकर संरक्षण देत आहेत. मार्क्सवादाला डोक्यावर उचलूनधरणारे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे व आंबेडकरवंशीय नेत्याचे हे पयत्न आंबेडकरवादीचळवळीला बळ देणारा ठरतील की, आंबेडकरवादी चळवळीचे वाट्टोळे करणारे ठरतील याची चिकित्साआंबेडकरवादी जनतेने केली पाहिजे.
बाबासाहेबांची लेकरं कधीच कम्युनिस्ट नव्हती. भारतातली कम्युनिस्ट चळवळही ब्राह्मणी चळवळ होती. ब्राह्मण लोकांनी बहुजनांना हाताशी धरुन केलेल्या या चळवळीलाबाबासाहेबांनी नेहमीच धारेवर धरले होते. अन् या सगळ्या कम्युनिस्टांचा जनक कार्ल मार्क्सयाचा तर बाबासाहेबांनी चक्क एक पुस्तक लिहून समाचार घेतला. बाबासाहेब त्यांच्या `कार्लमार्क्स की बुद्ध' ह्या पुस्तकातून कार्ल मार्क्सच्या सिद्धांताला तडाखेबाज उत्तर दिलेआहे. कार्ल मार्क्सची थिअरी, त्याचे सिद्धांत व त्यावरील उपाय हे सगळं अव्यवहार्य आहेतहे सांगताना बाबासाहेब हे ही निक्षून सांगतात की कम्युनिजमचा पायाच मुळात चुकीचा असल्यामुळेतो फार काळ तग धरु शकणार नाही. अन् आज आपण पाहतोच की जगातले सगळ्याच कम्युनिस्ट राष्ट्रांनीकम्युनिजम सोडून वेगळ्या वाटा शोधल्या आहेत. थोडक्यात मार्क्सिझम वा कम्युनिजम हा व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाहीचीमूल्ये पायदळी तुडविणारा मानवी समाजाला मिळालेला शाप आहे. आणि हे मानवी हक्काच्या विरोधीअसलेली विचारसरणी आंबेडकरी जनतेत रुजविण्याचं पाप कोण करत आहे तर कबीर कला मंच. आणित्यांना संरक्षण देत आहेत, आंबेडकरांच्याच समाजातील लेखक, विचारवंत आणि आंबेडकरवंशीयनेते! ज्या कम्युनिस्टांना बाबासाहेबांनी वाऱयालाही उभं नाही केलं ते चक्क आता बाबासाहेबांच्याचघरातून आंबेडकरवादी चळवळीत घुसत आहेत. यामुळे आंबेडकरी चळवळ उध्वस्त करण्यास आंबेडकरांच्याचरक्ताचे वंशच पुढे सरसावले आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
कबीर कला मंचाचे कलाकार डोक्यावर निळी पट्टी बांधून जेव्हा सर्वत्र फिरू लागले तेव्हा प्रथम दर्शनी ते आंबेडकर चळवळीचाच भाग असल्याचे भासले खरे...! पण, त्यांच्या मुखातून लाल सलाम ऐकल्यावर मात्र मी सावध झालो. का? तर लाल सलाम हा ज्यांचा नारा आहे ते देशाचे संविधान, संसद,निवडणुक पद्धती या संवैधानिक यंत्रणेला संडासचा डब्बा म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रक्तहिनमार्गाने सामाजिक आणि आर्थिक कांती घडवून आणण्याचा उद्घोष करतात. तर लाल सलामवाले डफलीच्यातालावर आणि बंदुकीच्या गोळीतून कांती करण्याच्या मार्गाचा पुरस्कार करतात. बाबासाहेबांनीमाणसाच्या बौद्धीक स्थैर्यासाठी आवश्यक ठरविलेल्या धम्माला लाल सलामवाले अफुची गोळीमानतात. अन याच्या अगदी उलट आंबेडकरवादी लोक बुद्धाच्या धम्मावर आणि संविधानावर जिव ओवाळून टाकतात. हा एवढा मोठा विरोधाभास जयभीमवाल्यांमध्येआणि लाल सलामवाल्यांमध्ये आहे. हा फरक दुर्लक्षित करुन चालणार नाही.
अशा या डोक्यावर निळी पट्टी व अंगात लाल डगला घातलेल्या दर्मियाँ पजातिच्या कबीर कलामंचीय सोंगाड्यांची धरपकड सुरु आहे. मात्र या धरपकडीला आंबेडकरवंशीयपकाश आणि ब्रह्मोकम्युनिस्ट आनंद पटवर्धन म्हणतात की कबीर कलामंचीय कार्यकर्त्यांनीशरणागती पत्करलेली नसून सत्याग्रह केला आहे. बिचाऱया ककम(कबीर कला मंच) च्या कलाकारांच्या या शरणागतीलाएक कम्युनिस्ट आणि एक आंबेडकरवंशीय चक्क गांधीवादी सत्याग्रहाच्या हंड्यात घालून कोणतीखिचडी पकवू इच्छितात हे त्यांचे त्यांनाच माहित! शितल साठे व सचिन माळी व्यतिरीक्त आजून चार नावं देताना पटवर्धन म्हणतात... "सागर गोरखे, रुपाली जाधव, रमेश गायचोर व ज्योती जाधव हे सगळे प्रकाश आंबेडकर व इतर आंबेडकरी कार्यकर्त्यां सोबत बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले नि तिथून मंत्रालयात जाऊन आबा पाटलांची भेट घेतली.लाल सलाम नावाचं क्रांती गीत म्हणून सत्याग्रह केला..." वगैरे लिहतात. ही तर चक्क बनवेगिरी आहे. लाल पितांबर नेसून जयभीमचाआणि कॉम्रेडचा अघोरी संकर घडवून आणणाऱया पटवर्धनांची ही बनवेगिरी त्यांचे लाल पितांबरफेडल्याशिवाय उघडी पडणार नाही. या दृष्टीने आंबेकरवादी जनतेने पावले टाकली पाहिजे.लाल सलामचा अन आंबेडकरवादाचा काहीही संबंध नाही. तरही कबीर कला मंचाचे कलाकारडोक्यावर निळी पट्टी बांधून मुखाने लाल सलामचा गजर करीत आंबेडकरवादाला बदनाम करण्याचापयत्न करीत असतील तर ते आपली फसवणूक करीत आहेत हे निश्चित. त्यांच्या या फसवणुकीच्यापयत्नांना संरक्षण देणाऱया रंगबदलू सरड्यांपासून आत्यंतिक सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.
संविधानाला मानणारे आंबेडकरवादी अन संविधानाला न मानणारे कम्युनिस्ट हे दोघे एकच कसे काय होऊ शकतात. आता कोणी म्हणेल की सगळे गट संविधान नाकरत नाही. कम्युनिस्टांचा फक्त एकच गट संविधान नाकरतो... अरे हो, मान्य पण त्यांच्या इतर गोष्टी तरी कुठे आंबेडकरी तत्वाशी जुळतात? कम्युनिस्टांचे कितीही गट असो तो प्रत्येक गट मार्क्सला तर मानतोच ना? अन बाबासाहेबानी थेट मार्क्सच नाकारला... मग त्या मार्क्सचा पिल्लु कोणताही कम्युनिस्ट असो... तो आंबेडकरवादी होऊच शकत नाही. मग प्रश्न उभा होतो तो कबीर कला मंच कोणाचा? आंबेडकरवाद्यांचा की कम्युनिस्टांचा?
हा कबीर कला मंच कोणाचा औरस/अनौरस पुत्र आहे हे जेव्हा सिद्ध होईल तेव्हा होईलच. पण आता काही तर्प व कसोट्या लावून त्याची दिशा, धोरणं व कार्य याचा अंदाज घेता येईल. ते संविधानिक मार्गाने चालतात का? बुद्धाचं तत्वज्ञाना मानतात का? अहिसंक लढ्यावर विश्वास आहे का? अन सगळ्यात महत्वाचं शस्त्रधाऱयांशी त्यांचे काही लागेबांधे आहेत का? हे सगळं तपासलं पाहिजे.
आमच्या बाप-दादांनी समग्र सामाजिक परिवर्तनासाठी पचंड संघर्ष उभा केला. पण त्यांच्यापैकी कोणी कधीच लाल सलाम घातला नव्हता. अन् कबीर कला मंचाचा नारा लाल सलाम आहे. म्हणजे हे आमच्या रक्ताचे नाहीत हे निर्विवाद सिद्ध होते. कबीर कला मंच आंबेडकरी विचाराची संघटना नाही हे सांगण्यासाठी व सिद्ध करण्यासाठी हा लाल सलाम पुरेसा आहे.
कबीर कला मंचाच्या पोरांना प्रकाश आंबेडकर खुद्द पाठिवरुन हात फिरवून कुरवाळताना उभ्या महाराष्ट्रांनी पाहिले. शितल साठे व सचिन माळी यांनी जेव्हा आत्मसमर्पण केलं तेव्हा खुद्द प्रकाश आंबेडकर तिथे हजर होते. त्यानी कबीर कला मंचाची पाठराखण केली. यावरुन लोकाना असे वाटले असेल की हे कबीर कला मंच म्हणजे आंबेडकरी चळवळीचाच भाग आहे... पण ते तसे नक्कीच नाही. प्रकाश आंबेडकर कबीर कला मंचाच्या पाठीशी उभे राहात असतील तर त्यानी वैचारीक स्थलांतर केले असे म्हणावे लागेल. ते आंबेडकरवाद सोडून कम्युनिस्ट बनले असतील... पण प्रकाश आंबेडकर पाठराखण करत आहेत म्हणजे कबीर कला मंच आंबेडकरी संघटना बनली असे म्हणता येणार नाही. राहीला प्रश्न प्रकाश आंबेडकरांचा तर त्यांना आपण विचारले पाहिजे की, ते यापुढे जयभीम म्हणणार की लाल सलाम म्हणणार? जर त्यांनी जयभीम म्हंटले तर ते तरतील... अन लाल सलाम म्हंटले तर पुढच्या निवडणुकीत जनता त्यांना लालोलाल करुन फेकून देणार. अन जर त्यांनी म्हटलं की मी जयभीमही म्हणणार अन लाल सलामही म्हणणार तर मात्र हा मोठा धक्का असेल. ती लबाडी असेल. आंबेडकर घराण्याचा आंबेडकरवाद ते कम्युनिस्ट असा तो प्रवास झाला असे सिद्ध होईल. चळवळीच्या दृष्टीने ही अत्यंत घातक गोष्ट असेल. महाराष्ट्रात आजवर फक्त पूर्वाश्रमीचे महारच आंबेडकरवादी होते. आता मात्र मोठा बदल होत आहे. इतर जातीचे लोकही आंबेडकरवादाची कास धरत आहे. आंबेडकरवादाची एक नवी लाट उसळताना आपण पहात आहोत. मराठे ते ओबीसी नि भटके अशा सर्व स्तरातून आंबेडकरवादाकडे प्रवास सुरु झाला आहे. अन् अशावेळी एक आंबेडकर मात्र कम्युनिस्ट बनावा यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.
कबीर कला मंचच्या कलाकारांना काय करायचं ते त्यानी करावं. पण ते जर कम्युनिस्टांचं`लाल सलाम' गाणार असतील तर त्यांनी निळी पट्टी उतरवावी. कारण निळी पट्टी ही आंबेडकरीजनतेची व चळवळीची ओळख आहे. त्याचबरोबर या निळ्या पट्टीने आजवर अनेक सत्याग्रह करतानास्वतःचं रक्त सांडलं तरी दुसऱयावर हात उगारला नाही. सत्याग्रहाची एक तेजस्वी परंपराचालविणारी निळी पट्टी कम्युनिस्टांनी डोक्यावर लावावी हे आंबेडकरी जनतेस अमान्य आहे.आंबेडकरी समाज कधीच कम्युनिझमचा समर्थक नव्हता व पुढेही नसेल. बाबासाहेब खुद्द कम्युनिझमचाकडाडून विरोध करत असत. त्यामुळे कबीर कला मंचाच्या कलाकारांच्या डोक्यावर निळी पट्टीअन् तोंडात लाल सलाम म्हणजे हा चक्क बाबासाहेबांचा अपमान आहे. त्यांना लाल सलाम गायचंचअसेल तर त्यांनी खूशाल गावं... फक्त ती डोक्यावरील निळी पट्टी उतरवावी. बस्स!
आम्ही जयभीमवालेआहोत... आमचा लाल सलामशी काही संबंध असूच शकत नाही. हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.
written by M.D.Ramteke,Pune
No comments:
Post a Comment