Wednesday, May 15, 2013

स्त्री-मुक्तीचे आद्यजनक महात्मा बसवेश्‍वर

स्त्री-मुक्तीचे आद्यजनक महात्मा बसवेश्‍वर

स्त्री-मुक्तीचे आद्यजनक महात्मा बसवेश्‍वरजयंती विशेषकोणत्याही समाजात स्त्री हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. स्त्री ही आपल्या कुटुंबात अतिशय प्रेरक शक्ती असते. वेदकाळात स्त्रियांना समान वागणूक दिली जात होती; परंतु १२ व्या शतकापर्यंत स्त्रियांचा समाजातील दर्जा घसरत चालला होता. स्त्रियांना गुलामाप्रमाणे वागविले जात होते. माता, भगिनी, पत्नी आणि कन्या या नात्यांनी समाजात वावरणारी स्त्री नेहमीच पुरुषांपेक्षा कमी प्रतीची मानली जात होती. स्त्रीचा उल्लेख प्राचीन काळापासून शुद्रांच्या बरोबरीने केला गेला. धर्माच्या नावाखाली तिच्यावर बंधने घालण्यात आली. म. बसवेश्‍वरांना समाजातील हा स्त्री-पुरुष भेदभाव खटकला. त्यामुळे १२ व्या शतकात म. बसवेश्‍वरांनी पुरुष-स्त्री समानतेचे रणशिंग फुंकले. १२ व्या शतकात म. बसवेश्‍वरांनी स्त्रीच्या भोवती असलेली ही बंधने मोडून काढून स्त्री-मुक्तीचा नवा विचार दिल्यामुळे म. बसवेश्‍वर काळाच्या कितीतरी पुढे पाहात होते हे दिसून येते.१२ व्या शतकात म. बसवेश्‍वरांनी स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या सुधारणा केल्या, त्या अचंबित करणार्‍या आहेत. त्यांनी १२ व्या शतकात महिलांच्या बहुउद्देशीय संघटना स्थापन केल्या. 'अनुभव मंडप' ही बसवेश्‍वरांनी स्थापन केलेली जगातील पहिली लोकसभा ठरली. अनुभव मंडपात ७00 पुरुष व ७0 स्त्रिया होत्या. त्या मुक्तपणे आपले विचार व्यक्त करीत. बसवेश्‍वरांनी स्थापन केलेल्या या अनुभव मंडपात स्त्रियांना धार्मिक व सामाजिक क्षेत्रात पूर्ण स्वातंत्र होते. महात्मा बसवेश्‍वर बिज्जल राजाकडे प्रधानमंत्री असताना त्यांनी बालविवाहास विरोध व पुनर्विवाहास संमती दिली. समाजातील दुर्लक्षित वेश्यांनासुद्धा त्यांनी जगण्याची हिंमत दिली. वेश्यांचे पुनर्वसन तर त्यांनी केलेच; पण त्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षणही आपल्या कार्यकर्त्यांद्वारे दिले. सुळी संकबे या वेश्येला त्यांनी आपल्या अनुभव मंडपात प्रवेश दिला. कार्यकर्त्यांमार्फत त्यांना साक्षर केले. सुळी संकबे यांनी नंतर अनेक वचने (अभंग) लिहिली आहेत. अनुभव मंडपातील ७0 पैकी ३0 ते ३५ महिला वचनकार (अभंगकार लिहिणार्‍या) त्यांनी तयार केल्या. अक्का महादेवी यांनी तर कन्नड साहित्याची मोठी सेवा केली. आद्य स्त्री वचनकार म्हणून त्या नावारूपास आल्या. भारतीय संस्कृतीत स्त्रियांना धर्मगुरू होता येत नाही; परंतु म. बसवेश्‍वरांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाप्रमाणे पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही धर्मगुरू होता येते, असे त्यांचे मत होते. सांगली जिल्ह्यातील दानम्मा यांनी स्वत:च्या लग्नाबरोबर ५५५ सामुदायिक लग्ने करून दाखवून समाजकार्य केले आहे.म. बसवेश्‍वरांच्या या क्रांतीकार्याला सनातनी, प्रतिगामी विचारांच्या लोकांचा प्रखर विरोध होता. म. बसवेश्‍वरांची मोठी बहीण गंगाविका यांनी तर प्रतिगाम्यांपासून वचन साहित्याचे रक्षण केले. त्यासाठी महिला गणाचारही (संघर्ष दल) स्थापन केले होते. उद्योग म्हणजेच कैलास, असे बसवेश्‍वरांचे मत होते. ज्या स्त्रियांना उद्योग केंद्रात येऊन उद्योग करता येणार नाही, त्यांच्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांमार्फत घरी जाऊन उद्योगाचे शिक्षण दिले. प्रत्येक व्यक्ती उद्योगशील असलीच पाहिजे, असा बसवेश्‍वरांचा कटाक्ष होता. सर्व स्तरातील स्त्रियांच्या जीवनाकडे बसवेश्‍वरांचे लक्ष होते. बालिका, किशोरी, तरुणी, प्रौढ, वृद्ध, अविवाहित, विवाहित, घटस्फोटिता, परित्यक्त्या, देवदासी, विधवा, वेश्या अशा सर्व अवस्थांतील स्त्रियांना त्यांनी व्यावहारिक व सर्वसमावेशक कृतिशील साथ दिली. सर्व स्तरातील स्त्रियांना सन्मानाने, धैर्याने, आत्मविश्‍वासाने व सर्मथपणे जगण्याची उमेद म. बसवेश्‍वरांनी दिली. शासनालाही जे शक्य झाले नाही, ते त्यांनी १२ व्या शतकात प्रत्यक्ष कृतीने करून दाखविले.म. बसवेश्‍वरांच्या स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याचा गौरव करताना डॉ. सरोजिनी शिंत्री म्हणतात, 'अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक हक्कांबद्दल प्रय▪केले; परंतु धार्मिक क्षेत्रातसुद्धा त्यांना हक्क मिळावा म्हणून कोणी विशेष प्रय▪केलेले नाहीत. केवळ बसवेश्‍वरांनीच हे जाहीर केले की, स्त्रियासुद्धा धार्मिक क्षेत्रात पुरुषांइतक्याच हक्कदार आहेत. म. बसवेश्‍वर जयंतीनिमित्त स्त्री उद्धारक या थोर महात्म्यास कोटी कोटी प्रणाम!ॅ जनार्दन ब. कोष्टी, वासिंद (पू.), जि. ठाणे
जयंती विशेषकोणत्याही समाजात स्त्री हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. स्त्री ही आपल्या कुटुंबात अतिशय प्रेरक शक्ती असते. वेदकाळात स्त्रियांना समान वागणूक दिली जात होती; परंतु १२ व्या शतकापर्यंत स्त्रियांचा समाजातील दर्जा घसरत चालला होता. स्त्रियांना गुलामाप्रमाणे वागविले जात होते. माता, भगिनी, पत्नी आणि कन्या या नात्यांनी समाजात वावरणारी स्त्री नेहमीच पुरुषांपेक्षा कमी प्रतीची मानली जात होती. स्त्रीचा उल्लेख प्राचीन काळापासून शुद्रांच्या बरोबरीने केला गेला. धर्माच्या नावाखाली तिच्यावर बंधने घालण्यात आली. म. बसवेश्‍वरांना समाजातील हा स्त्री-पुरुष भेदभाव खटकला. त्यामुळे १२ व्या शतकात म. बसवेश्‍वरांनी पुरुष-स्त्री समानतेचे रणशिंग फुंकले. १२ व्या शतकात म. बसवेश्‍वरांनी स्त्रीच्या भोवती असलेली ही बंधने मोडून काढून स्त्री-मुक्तीचा नवा विचार दिल्यामुळे म. बसवेश्‍वर काळाच्या कितीतरी पुढे पाहात होते हे दिसून येते.

१२ व्या शतकात म. बसवेश्‍वरांनी स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या सुधारणा केल्या, त्या अचंबित करणार्‍या आहेत. त्यांनी १२ व्या शतकात महिलांच्या बहुउद्देशीय संघटना स्थापन केल्या. 'अनुभव मंडप' ही बसवेश्‍वरांनी स्थापन केलेली जगातील पहिली लोकसभा ठरली. अनुभव मंडपात ७00 पुरुष व ७0 स्त्रिया होत्या. त्या मुक्तपणे आपले विचार व्यक्त करीत. बसवेश्‍वरांनी स्थापन केलेल्या या अनुभव मंडपात स्त्रियांना धार्मिक व सामाजिक क्षेत्रात पूर्ण स्वातंत्र होते. महात्मा बसवेश्‍वर बिज्जल राजाकडे प्रधानमंत्री असताना त्यांनी बालविवाहास विरोध व पुनर्विवाहास संमती दिली. समाजातील दुर्लक्षित वेश्यांनासुद्धा त्यांनी जगण्याची हिंमत दिली. वेश्यांचे पुनर्वसन तर त्यांनी केलेच; पण त्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षणही आपल्या कार्यकर्त्यांद्वारे दिले. सुळी संकबे या वेश्येला त्यांनी आपल्या अनुभव मंडपात प्रवेश दिला. कार्यकर्त्यांमार्फत त्यांना साक्षर केले. सुळी संकबे यांनी नंतर अनेक वचने (अभंग) लिहिली आहेत. अनुभव मंडपातील ७0 पैकी ३0 ते ३५ महिला वचनकार (अभंगकार लिहिणार्‍या) त्यांनी तयार केल्या. अक्का महादेवी यांनी तर कन्नड साहित्याची मोठी सेवा केली. आद्य स्त्री वचनकार म्हणून त्या नावारूपास आल्या. भारतीय संस्कृतीत स्त्रियांना धर्मगुरू होता येत नाही; परंतु म. बसवेश्‍वरांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाप्रमाणे पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही धर्मगुरू होता येते, असे त्यांचे मत होते. सांगली जिल्ह्यातील दानम्मा यांनी स्वत:च्या लग्नाबरोबर ५५५ सामुदायिक लग्ने करून दाखवून समाजकार्य केले आहे.

म. बसवेश्‍वरांच्या या क्रांतीकार्याला सनातनी, प्रतिगामी विचारांच्या लोकांचा प्रखर विरोध होता. म. बसवेश्‍वरांची मोठी बहीण गंगाविका यांनी तर प्रतिगाम्यांपासून वचन साहित्याचे रक्षण केले. त्यासाठी महिला गणाचारही (संघर्ष दल) स्थापन केले होते. उद्योग म्हणजेच कैलास, असे बसवेश्‍वरांचे मत होते. ज्या स्त्रियांना उद्योग केंद्रात येऊन उद्योग करता येणार नाही, त्यांच्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांमार्फत घरी जाऊन उद्योगाचे शिक्षण दिले. प्रत्येक व्यक्ती उद्योगशील असलीच पाहिजे, असा बसवेश्‍वरांचा कटाक्ष होता. सर्व स्तरातील स्त्रियांच्या जीवनाकडे बसवेश्‍वरांचे लक्ष होते. बालिका, किशोरी, तरुणी, प्रौढ, वृद्ध, अविवाहित, विवाहित, घटस्फोटिता, परित्यक्त्या, देवदासी, विधवा, वेश्या अशा सर्व अवस्थांतील स्त्रियांना त्यांनी व्यावहारिक व सर्वसमावेशक कृतिशील साथ दिली. सर्व स्तरातील स्त्रियांना सन्मानाने, धैर्याने, आत्मविश्‍वासाने व सर्मथपणे जगण्याची उमेद म. बसवेश्‍वरांनी दिली. शासनालाही जे शक्य झाले नाही, ते त्यांनी १२ व्या शतकात प्रत्यक्ष कृतीने करून दाखविले.

म. बसवेश्‍वरांच्या स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याचा गौरव करताना डॉ. सरोजिनी शिंत्री म्हणतात, 'अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक हक्कांबद्दल प्रय ▪केले; परंतु धार्मिक क्षेत्रातसुद्धा त्यांना हक्क मिळावा म्हणून कोणी विशेष प्रय▪केलेले नाहीत. केवळ बसवेश्‍वरांनीच हे जाहीर केले की, स्त्रियासुद्धा धार्मिक क्षेत्रात पुरुषांइतक्याच हक्कदार आहेत. म. बसवेश्‍वर जयंतीनिमित्त स्त्री उद्धारक या थोर महात्म्यास कोटी कोटी प्रणाम!

-----------------Raju Gaikwad

No comments:

Post a Comment