Monday, April 2, 2012

आयपीएल आणि वाद

आयपीएल आणि वाद


आयपीएल आणि वाद
प्रशांत ननावरे

२००८साली सुरू झालेल्या आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमिअर लीगने मनोरंजनाची नवी परिमाणं भारतीयांसमेर ठेवली. भरपूर पसा, स्टारडम, चीअरगर्ल्स आणि खूप सारं मनोरंजन याची पक्की खात्री म्हणजे आयपीएलने असं समीकरण बनून गेलं. पण गेली चार वष्रे आयपीएलच्या प्रत्येक सिझनमध्ये नवीन नवीन वाद निर्माण होतच आहेत. अशाच काही वादांचा घेतलेला हे धांडोळा.


२००८ साली सुरू झालेल्या आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगने मनोरंजनाची नवी परिमाणं भारतीयांसमेर ठेवली. भरपूर पसा, स्टारडम, चीअर गर्ल्स आणि खूप सारं मनोरंजन याची पक्की खात्री म्हणजे आयपीएल, असं समीकरण बनून गेलं. पण गेली चार वष्रे आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये नवीननवीन वाद निर्माण होतच आहेत. अशाच काही वादांचा घेतलेला हा धांडोळा.
ऑस्ट्रेलिया
सुरुवातीसच ऑस्ट्रेलियाच्या खेळांडूंच्या सहभागाविषयी व बॅगी ग्रीनच्या प्रायोजकत्वावरून वादळ उठलं होतं. अ‍ॅण्ड्रय़ू सायमंडच्या नावाला पहिल्या सीझनच्या लिलावतच सर्वाधिक बोली मिळाली होती आणि त्यामुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या होत्या.
सट्टा
जेव्हा भारतात क्रिकेट खेळलं जातं तेव्हा त्यावर सट्टा लागणं हे काही नवीन नाही. ललित मोदींची गच्छंती झाल्यानंतर आता सट्टाबाजार पुन्हा तेजीत सुरू झाला आहे. फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार दरवर्षी क्रिकेटवर एकशे साठ हजार कोटींचा सट्टा लावला जातो. त्यावरूनच आयपीएलवर किती सट्टा लागत असेल याची कल्पना येईल. सट्टाबाजारामुळे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी उत्पान्त्य फेरीचे सामने हे बंगलोरऐवजी मुंबईत व्हावेत यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. एवढंच नव्हे तर आयकर विभागाने बीसीसीआय आणि आयपीएलच्या कार्यालयांवरसुद्धा धाडी घातल्या होत्या. पण यामधून फारसं काही बाहेर येऊ शकलं नाही. सट्टय़ाला संरक्षण मिळालं, कारण क्रिकेटपेक्षा तोच सर्वात मोठा खेळ आहे.
आयपीएलमधील खोटा खेळाडू
कोलकाता नाइट रायडर्सचा हा खेळाडू असल्याचा दावा त्याने केला होता. तो ब्लॉग लिहायचा. त्यावर अनेकजण भेट द्यायचे. ट्विटरवरून तो ड्रेसिंग रूममधील सर्व गोष्टी फोडत होता. खेळाची स्ट्रॅटेजी कुठे चुकली इथपासून सर्वकाही. २००९ साली हे होत होतं. तो खेळाडू खरा होता का? तो जे काही सांगत होता ते खरं होतं का? त्याला ट्विटरवर लाखो फॉलोवर्स होते. या खऱ्याखोटय़ा खेळाडूचा शेवटपर्यंत पत्ता लागला नाही. पण त्याने आयपीएलच्या माध्यमातून भरपूर प्रसिद्धी मिळवली.
बिअरचा घोट
आयपीएलच्या दुसऱ्या सीझनमध्ये शेन वॉर्न आणि इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बिअर पिऊन िधगाणा घातला होता. खरंतर हे सर्व क्रिकेट मदानाच्या बाहेर झालं, त्यामध्ये फक्त मनोरंजन होतं. पण त्याचा भरपूर बोलबाला झाला.
टीममधील समभागधारक
पहिल्या दोन सीझनमध्ये आयपीएल टीमचे सर्व मालक कुठेच दिसले नाहीत, परंतु तिसऱ्या सीझनला मात्र एकएकजण समोर यायला लागला. जेव्हा ललित मोदींनी कोची टीमची घोषणा करीत कोची टीमच्या शेअर होल्डर्स संघातील समभागधारकांचे टक्के ट्विटरवर जाहीर केले, तेव्हा मात्र मोठी गोची झाली आणि तिसऱ्या सीझनला हा सर्वात मोठा चच्रेचा विषय बनला.
कोची
कोची संघाचा प्रवेश आयपीएलमध्ये किती वादविवाद उभे करील हे जर का आधी माहीत असतं तर शशी थरूर बहुतेक यात पडलेच नसते. एकटय़ा कोची संघाने शशी थरूर, सुनंदा पुष्कर, ललित मोदी, ट्विटर, उत्तर-दक्षिणेकडचं राजकारण, लोकसभा, आयकर विभाग, राष्ट्रवादी अशा अनेक वादग्रस्त गोष्टींना यामध्ये सामावून घेतलं. सुनंदा पुष्कर यांना कोची संघापासून दूर जावे लागले, तर शशी थरूर यांना नव्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आधी आपले मंत्रिपद यासाठी गमवावे लागले.
ललित मोदी
आयपीएलच्या सुरुवातीस आणि पहिल्या दोन सीझनमध्ये ललित मोदी म्हणजे आयपीएल आणि आयपीएल म्हणजे ललित मोदी असं समीकरण होऊन बसलं होतं. पण आता ललित मोदी म्हणजे घोटाळा असं समीकरण झालं आहे. ज्या ललित मोदींनी आयपीएलला चेहरामोहरा दिला, आज ते अज्ञातवासात आहेत.
नेस वाडिया
किंग्स इलेव्हन पंजाब या संघावरील सर्व फोकस हा संघाची मालकीण प्रीती िझटा आणि युवराज सिंग यांच्यावरच असला तरी नेस वाडिया हेदेखील संघाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये जेव्हा वाडिया तिकिटांचा काळाबाजार करीत होते त्या वेळी एका वरिष्ठ पोलिसाने त्यांना हटकले आणि वाडिया यांनी आपण कोण आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रकाशझोतात येण्यासाठी एवढं कारण पुरेसं होतं.
अटकेपार झेंडा
देशभर होणाऱ्या स्फोटांच्या मालिकांमुळे सामान्य जनतेची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे, त्यामुळे आयपीएलसाठी अधिक सुरक्षा प्रदान करता येणार नाही. म्हणून तुम्ही या वर्षी आयपीएल घेऊ नका, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी काढला. पण माघार घेतील ते ललित मोदी कुठले. त्यांनी आयपीएलचा झेंडा अटकेपार नेण्याचे ठरवले. आणि आयपीएल थेट दक्षिण आफ्रिकेत खेळवली गेली. त्यामुळे आयपीएल ही इंडियन प्रीमिअर लीग न राहता इंटरनॅशनल प्रीमिअर लीग झाली.
अप्पर ते लोअर हाऊस
आयपीएल सुरू झालं की सर्व चॅनेल्स २४ तास, दोन महिने त्यावरच चर्चा करतात. देशातले इतर विषय संपले आहेत का, अशी टीका दरवर्षी होताना दिसते. नाक्यानाक्यावर नव्हे तर राज्यसभा आणि लोकसभेतही यावर चर्चा रंगताना दिसते. त्यामुळे विरोधक सत्तेत असणाऱ्या नेत्यांवर आरोप करताना दिसतात. मुलायम सिंग यांनी तर क्रिकेटवर बंदी आणण्याची मागणीसुद्धा केली होती.
काय महत्त्वाचे?
टी-२० वर्ल्ड कप महत्त्वाचा की आयपीएल मॅच, हा मोठा वाद मागच्या टी-२० वर्ल्ड कपच्या वेळी उभा राहिला होता. टी-२० वर्ल्ड कप सुरू व्हायच्या फक्त पाच दिवस अगोदर आयपीएलचे सामने संपले. त्यामुळे अनेक खेळाडूंना दुखापतींने ग्रासले होते. वीरेंद्र सेहवागला दुखापतीमुळे वर्ल्ड कपच्या बाहेर राहावे लागले होते. क्रिकेटच्या अस्ताला आता सुरुवात झाली आहे. त्या वेळी खऱ्या खेळाकडे दुर्लक्ष होऊन क्रिकेट हा खेळ फक्त पसे कमवायचं साधन राहील इथपर्यंत यावर बोललं गेलं.
आयपीएलचे प्रक्षेपण
वादंगाची सुरुवात ही आयपीएलच्या प्रक्षेपणापासून सुरू झाली. सोनी नेटवर्कला प्रक्षेपणाचे सर्व एक्स्लुजिव हक्क देण्यात आले होते. यावर सर्व चॅनेल्सने आयपीएलवर बहिष्कार घालण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे ललित मोदी यांनी सुरुवातीस सर्व संघांबरोबर या विषयावर चर्चा करण्याला नकार दिला. अनेक अमान्य होतील अशा अटी नियमावलीमध्ये होत्या. जी वर्तमानपत्रे आयपीएलचे सामने कव्हर करीत असतील त्यांच्या छायाचित्रकारांनी काढलेले सर्व छायाचित्रे चोवीस तासाच्या आत आयपीएलच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक होते. अन्यथा त्यांना पुढचा सामना कव्हर करता येणार नाही. त्याचप्रमाणे काही ठरावीक छायाचित्रेच वर्तमानपत्रांना आणि न्यूज एजन्सींना त्यांच्या संकेतस्थळावर वापरता येतील. आयपीएलच्या तिसऱ्या सीझनमध्ये टीव्ही चॅनल्सने आयपीएल सामन्यांमधील किती फुटेज वापरायचं यावरून वादंग उठलं आणि तेव्हासुद्धा चॅनल्सवाल्यांनी यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवल्यानंतर हा विषय शेवटच्या क्षणाला सोडवण्यात आला.
पाकिस्तानी खेळाडू
सर्व खेळाडू तयारी करून सज्ज आहेत, पण कधी आणि कुठे जायचं याचा पत्ताच नाही. अशी गत पाकिस्तानी खेळाडूंची झाली होती. टी-२० च्या जागतिक विजेत्या संघामधील एकाही खेळाडूला २०१० मध्ये कुठल्याच संघाने उचलले नाही. त्यानंतर बरेच वादंग उठले. बाळासाहेब ठाकरेंनी पाकिस्तानी खेळाडूंना संघात घेण्याविषयी नाराजी व्यक्त केली आणि त्याविरोधात कुणीच जाण्याची िहमत केली नाही. पण मग विदेश मंत्रालय आणि निवृत्त खेळाडूंना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शोएब अख्तरवर घातलेली बंदी हादेखील मोठं वादंग होता. त्याच्यावर पीसीबीने पाच वर्षे पाकिस्तनी संघाचं प्रतिनिधित्व करता येणार नसल्याचं सांगितलं असलं तरी एक व्यावसायिक खेळाडू म्हणून तो आयपीएलमध्ये खेळू शकतो असा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळेच तो कोलकाता नाइट रायडर्स या संघासाठी खेळू शकणार होता. बीसीसीआयला कोणताही नवा वाद नको असल्यामुळे त्यांनी त्याला पीसीबीची परवानगी आणायला सांगितली. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान याने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली व शोएब हा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध झाला.
हरभजन सिंग
पंजाब दा पुत्तर हरभजन सिंग हे आयपीएलमधील एक वादग्रस्त समीकरण म्हणावं लागेल. मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्यात हरभजन सिंगने केरळ एक्स्प्रेस श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावून आपलीच गोची करून घेतली होती. त्याच्या त्या हरकतीविरोधात बीसीसीआय कडक पवित्रा घेऊन त्याच्यावर आजन्म बंदी घालू शकली असती, पण थोडक्यात निभावलं. श्रीशांतच्या मुस्काटात मारल्यानंतर त्याच्या डोळ्यांतून गंगायमुना वाहू लागल्या आणि हा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला. एवढंच काय, पंजाब संघाची मालकीण प्रीती िझटाचेही डोळे डबडबले आणि तिने हरभजनवर कारवाई करा, असा पवित्रा घेतला. पण त्यानंतर हरभजनने पत्रकार परिषदेत श्रीशांतची माफी मागितली आणि हे प्रकरण थोडक्यात निभावलं.
त्यानंतर हरभजनने आणखी एक धाडसाची गोष्ट केली. २१ एप्रिल २०१० ला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्सचा पराभव केल्यानंतर उत्साहाच्या भरात भज्जीने म्हणजे मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीण नीता अंबानी यांना उचलून घेतलं. मीडियाने या विषयाला अंबानी यांच्या प्रस्थामुळे फार हाईलाइट केलं नसलं तरी सर्वसामान्यांमध्ये याची भरपूर चर्चा झाली.
प्रकाशाने घात केला
मदानावरील प्रकाश पुरेसा नसल्यामुळेही दोन वेळा वादंग उठले. दोन्ही वेळेस याचा फटका डेक्कन चार्जर्स या संघाला बसला. पहिल्या सामन्यात त्यांना कोलकाता नाइट राईडर्सविरोधात सामना गमवावा लागला, परंतु दुसऱ्या सामन्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यामुळे ते प्रकरण तिथेच मिटले.
मैदानावरील भाईगिरी
सामन्याच्या दरम्यान अनेक खेळाडू मदानमध्येच एकमेकांना दूषणं देताना दिसले तर काहीजण हमरीतुमरीवरदेखील आले. उमर गुल आणि श्रीशांत हे आघाडीवर होते. डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्यात उमर गुलने रोहित शर्मावर हल्लाबोल केला. श्रीशांतनेही आपली रेषा ओलांडून नको ते बोलला. कुठल्याही खेळात मदानावर त्याचे नियम पाळणे गरजेचे असते. त्याहीपेक्षा तिथे उपस्थित असलेल्या पंचांचा निर्णय गपगुमान मान्य करणे हे बंधनकारक आहे. त्यांच्याबरोबर जर का तुम्हा हुज्जत घातलीत तर तो गुन्हा ठरून तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते. गेल्या चारही सीझनमध्ये पंचांबरोबर हुज्जत घालण्याचे अनेक प्रसंग पाहावयास मिळाले. काही सामन्यांमध्ये असेही पाहावयास मिळाले की मदानावर उपस्थित पंचांनी दिलेला निर्णय खेळाडूंनी मान्य न करता तिसऱ्या पंचांच्या हातात तो निर्णय द्यावा यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती केली. यासाठी कोलकाता नाइट रायडर्सचा कप्तान सौरव गांगुली आणि दिल्ली डेअरडेविल्सचा कप्तान वीरेंद्र सेहवाग हे दोघे सर्वात पुढे आहेत.
बदली खेळाडू
डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली डेअरडेविल्सच्या एका सामन्यानंतर डेक्कन चार्जर्सचा कप्तान अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने वीरेंद्र सेहवागच्या टॅक्टिकविषयी शंका घेतली होती. त्याने त्या सामन्यामध्ये मोहम्मद आसिफ याने दोन षटकं टाकल्यानंतर त्याच्या जागी आपल्या संघातील चांगल्या खेळाडूबरोबर शोएब मलिक याला खेळवलं होतं. त्याने शेवटची दोन षटके टाकली आणि पंचाने सेहवागला हे करण्यावाचून थांबवलेसुद्धा नाही. तसेच त्या सामन्यामध्ये दिल्लीच्या बाजूने आधीच गुडघा दुखत असल्यामुळे गौतम गंभीरसाठी म्हणून आधीच एक बदली खेळाडू मदानावर होता. बदली खेळाडूंनी त्या सामन्यामध्ये चार झेल घेतले हे अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या जिव्हारी लागले.
दादा
मध्यंतरी कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खान आणि दादा म्हणजेच सौरव गांगुली यांच्यातही वाजल्याचं समोर आलं होतं. शाहरुख खानला आपली टीम विकायची आहे अशी अफवा ऐकू येत होती. सौरव गांगुलीला आपल्या टीमचा किंग व्हायचं होतं, तर शाहरुखला वाटत होतं, ज्याप्रमाणे फुटबॉलमध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय हे त्या संघाचा मालक आणि प्रशिक्षक घेतो तेच इथेसुद्धा व्हायला हवं.
चाहते
त्या त्या शहरातील चाहते हे आपल्या शहरातील संघालाच पािठबा देताना दिसतात. जर का त्या शहराच्या संघाचा सामना नसेल तर त्या शहरातील खेळाडूला त्यांचा पािठबा मिळतो. पण आयपीएलमध्ये सर्वच संघांमध्ये जगभरातील सर्व खेळाडूंचा समावेश दिसतो. त्या त्या शहरातील खेळाडू तसेच भारतीय संघातील खेळाडू हे एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. त्यातून प्रेक्षक हे नाराज होतात आणि हे सर्वाधिक मुंबई आणि कोलकाताच्या प्रेक्षकांच्या बाबतीत अधिक होताना दिसते. ते आपल्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंबाबत वाईट शब्दप्रयोग करून त्यांना डिचवण्याचा प्रयत्न करीत असतात, जे कुणालाही मान्य होणार नाही. यामध्ये युवराज सिंगने एकदा प्रेक्षकांना इतर संघांतील खेळाडूंचा सन्मान करण्याची विनंती केली होती.
चीअर गर्ल्स
सर्वात शेवटचं पण महत्त्वाचं म्हणजे चीअर गर्ल्सचा मदानावरील वावर. बंगलोर रॉयल चॅलेन्जचे सर्वेसर्वा विजय माल्ल्या यांनी सर्वप्रथम संघातील खेळाडूंबरोबर चीअर लीडर्स ठेवण्याचा हा ट्रेंड सुरू केला, त्यानंतर तो कित्ता सर्वच संघांनी गिरवायला सुरुवात केली. विजय माल्ल्या यांनी या चीअर लीडर्स वॉिशग्टन येथून मागवल्या होत्या, तर डेक्कन चार्जर्स या संघाने ऑस्ट्रेलिया येथून. काही चीअर लीडर्स या भारतातूनच निवडण्यात आल्या होत्या तर काहींना इंग्लंडवरून बोलावण्यात आलं होतं. यामध्ये सर्वात मोठं वादंग उठलं ते त्यांच्या कपडय़ांवरून. आपल्या आर. आर. पाटलांनी बंदिस्तपणे चालणाऱ्या डान्स बारवर बंदी घालून सामान्य माणसाकडून आपली पाठ थोपटून घेतली, परंतु या चीअर लीडर्स अतिशय तोकडे कपडे घालून जो काही नंगा नाच करीत आहेत हे आपल्याला दिसत नाही का, असा सवाल जेव्हा सर्वाकडून विचारला जाऊ लागला तेव्हा मात्र त्यांची फारच गोची झाली आणि मग त्यानंतर त्यांना सभ्य कपडय़ांमध्ये नाचण्याची परवानगी देण्यात आली. हे झाल्यानंतर आणखी एक बातमी आली की चीअर लीडर्समध्ये पण वर्णद्वेष केला जात आहे. कृष्णवर्णीय चीअर लीडर्सना यामध्ये डावलण्यात येत आहे. विझक्राफ्ट या आंतरराष्ट्रीय मनोरंजन मॅनेजमेंट कंपनीच्या मदतीने किंग्स इलेव्हन पंजाब या संघाने भाडय़ाने घेतलेल्या दोन चीअर लीडर्सना मोहाली येथे झालेल्या सामन्याच्या अगोदर बाहेर बसण्यास सांगण्यात आले, कारण त्यांची कांती गोरी नव्हती.
वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात नृत्य दिग्दर्शक शामक दावर यांच्या इंडियन चीअर गर्ल्सची झलक पाहायला मिळाली. भारतीय संस्कृती व परंपरेनुसार आमचे ड्रेस डिझाइन असल्याचे शामक दावर म्हणाला होता. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे आमचे काम असून त्याचे आम्हाला पसे मिळतात. याव्यतिरिक्त आम्हाला कुठल्याही राजकारणात पडायचे नसल्याचे मत या चीअर लीडर्सनी बोलून दाखवले होते. अमेरिका, ब्रिटनमध्ये चीअर लीडर्सना स्टार्सचा दर्जा आहे. असं असताना भारतात आपल्यावरून उठलेले वादळ म्हणजे आश्चर्याचा धक्का आहे, असं वॉिशग्टन रेडस्कीन या टीमच्या सदस्य असलेल्या चीअर लीडर्स म्हणाल्या होत्या. प्रत्येक मुलीला एका परफॉर्मन्समागे १० ते १२ लाख रुपये मिळत असल्याचे समजते. या मुली युक्रेन, रशिया, कॅनडा, उजबेकिस्तान आदी देशांमधील असतात आणि त्यांना अमेरिकेत प्रशिक्षण दिले जाते.
prashant.nanavare@expressindia.com

No comments:

Post a Comment